Featured
- Get link
- X
- Other Apps
संसार संसार !!!
संसार संसार !!!
सकाळ ची वेळ होती सगळ काही आवरून मिनाक्षी घरच्या छतावर बसलेली होती. घराचा एका बाजूला एक उंच लिंबाच झाड होत त्याची सावली घराचा निमं छत झाकत होती. त्या डेरेदार लिंबाचा सावलीत भिंतील टेकून मिनाक्षी बसली होती. ती तशी मनाने सोजावळ होती थोडीशी फिकट सावळ्या वर्णाची ती होती. सारसरीत असलेली ऊंची आणि कमनीय बांध्याने तिला एकडूम सुरेख रूप मिळाले होते. पण आस म्हणतात न देव एक हाताने देतो आणि एक हाताने घेतो ही तसेच सौन्दर्य भरभरून मिळलेल असल तरी मिनाक्षी मात्र जन्मापासून अबोल होती. तिला समोरच्याच्या ओठांचा हालचाली वरून कळायच की समोरचा काय बोलतोय पण स्वतःला बोलताना मात्र ईशाऱ्यांमद्धे सांगावे लागत असे. सासरी आल्यापासण काहीतरी तिला रुतत होत्त रोज काम आटपून आपल्या विचारांत हरवण्यासाठी ती छतावर जाऊन बसंत असे, आजाही दररोज प्रमाणे ती छतावर बसलेली होती.
खरंतर मिनाक्षीच लग्न म्हणजे प्रेमविवाह होता समाजाचा आणि घरच्यांचा वोरोधात जाऊन करावा लागलेल. ती आणि समीक्ष लाहानपणा पासून एकमेकासोबत वाढलेले दोघांची जात जरी सारखी असली तरी आंतरजातीय विवाहला येतील तेवढ्याच अडचणी आलेल्या. साम, दाम, दंड वापरुन पण टिकलेल्या त्यांचा नात्यात आत्ता भरपूर प्रमाणात गोदी उतरली होत्ती . मिनाक्षी तशी खेळकर वृत्तीची तिच्या स्वभावात भिनलेला हा गुण अगदी अविभाज्य आणि समीक्ष च्या आवडता होत्ता. पण हल्ली शांत झालेल्या मिनाक्षी च्या स्वभावात तिला काहीतरी मनातून खात आहे हे समीक्ष ला कळून चुकले होते तो रोज तिला विचारत असे पण ती विषय बदलत असे कायम समीक्ष च्या जगत रामणारी मिनाक्षी आत्ता शांत झाली होती.
मिनाक्षीच्या आयुष्यात फक्त एकाच गोष्ट् खूप महत्वाची होती ती म्हणजे त्यांचा दोघांचा असलेल जग. तस बघायच तर मिनाक्षी समीक्ष साथी पूर्ण वेडी होती. म्हणून घरात संगळ्यांच वीरोध पत्करून तिने समीक्ष सोबत लग्न केल. तिच्या घरच्याना समिकक्ष एकाच जातीचा असला तरी प्रेम विवाह नको होत्ता आणि तो टाळण्यासाठी जे करता येईल ते करत होतते कधी कधी समीक्ष आणि मिनाक्षी ल मारहाण करणे तसेच त्यांचावर वेगळ्या वेगळ्या मानसिक प्रयोग करून त्यांना एक मेकपासून तोडण्याचा प्रयत्न करणे अस सगळ होऊन पण त्यांनी आपल्या नात्याला तडा जाऊ नाही दिला. खरंतर मिनाक्षी साठी समीक्ष म्हणजे एक जगण्याचा सहारा होत्ता जस एखाद्या बोटीला विसाव्यासाठी लंगर लागतो तसंच समीक्ष तिच्या आयुष्याचा लंगर होत्ता. तिच्या आईने समीक्षला उचरलेले अबद्र शब्दांवरून स्वतःच्या जन्मदात्या आईसोबत न बोलणारी मिनाक्षी होती. ती कायम त्याचा आवडी निवडी पुरवत असे तिला त्याचा कोणत्याच गोष्टीच ओझ वाटत नसे त्याने सांगितलेल काम तिच्या साथी एक चातकाच्या चोचीतल्या पाहिल्या पाऊसच्या थेंबाप्रमाणे होता. ती त्याच्यात एवढी गुंतली होतटि की ती कधी त्याचयानुसार स्वतःला बदली ही पण कलाळ नाही पण याचाच तिला खूप भारी वाटत असे. तिच्या जगत फक्त समीक्ष होत्त ती त्याच्या पासून काहीच लपवत नसे सगळ खर बोलण आणि नात्यात पारदर्शकता ठेवण म्हणजे जणू काही त्यांचा नात्याचा अविभाज्य घटक बनला होता खरतर दोघनयही एकमेकाशी खोट बोलावत नसे अस काहीतरी खूप चुकते अससच वाटत असे. आणि शेवटी नविलाजणे का होईन खर सांगितल जात असे. तिला समीक्ष सोडून काहीच दिसत नसे. त्याच्या त्या छोट्याश्या दुनियेत ती हरवलेली असे. त्याला कोणी काही थोड जरी वाईट बोल तरी ती खपवून घेत नसे. त्याने तिच्यावर खूप बंधने घातलेली होती पण ती तिला मनापासून आवडत होती जणू काही तील त्याच मनातल्या प्रतेक गोष्ट न बोलत पण समजते अशी.
अस त्यांच नात एक महिन्या पूर्वी लग्नात बदलेल. लग्नानंतर तिच्या घरांच्या नी मिनाक्षीला आपल मानायला नकार दिला. ते तिचा तिरस्कार करु लागले एवढंच नव्हे तर तिच्या आईने ती मेलीय आमच्यासाठी आस बोलून ही दाखवल. त्यामुळे ती उदास असेल अस समीक्ष ल वाटत होत्त पण आज त्याला राहवत नवत. तो छतावर आला भिंतीला टेकून बसलेली मिनाक्षी पाहून त्याला थोडी भुरलच पडली तिला कितीही बघितली तरी त्याच डोळ्याना तिच्यातल नावीन्य काही संपत नसे कायम आपण पहिल्यांदा बघतोय आस वाटत होत. वाऱ्यायासोबत झोके खेळणाऱ्या तिच्या लटांकडे त्याच लक्ष वेधल गेल. हळूहळू मधीच येणाऱ्या झुळूकीं मुळे तिच्या त्या चेहऱ्याच्या अवती भोवती खेळणाऱ्या लटा ती हाताने सावरत होती. समीक्ष ही दृश्य पाहण्यात अगदी रमला होत्ता. तिच्या डोळ्यांचा कोनाड्यात छोटीशी अश्रूंची धार घरंगळत आलेली समिसक्ष च्या नजरेत भरली आणि तो भानावर आला आणि थोडा घसा साफ कारवा तसा आवाज करून मिनाक्षी शेजारी जाऊन बसला.
तिच्या गालावर हाथ ठेऊन बोटणी तिचे आस्वांना आवर घालू लागला. स्वतःला एवढ्या वेळ आडवत असलेली मिनाक्षी आता समीक्ष ला मिठी मारून रडू लागली होती. ही पाहून समीक्ष ने तिला घट्ट मिठी मारून तिच्या डोक्याला आपल्या ओठाणी स्पर्श केला तिला थोडावेळ रडू दिल्यानंतर त्याने तिला सावरायचा प्रयत्न सुरू केला तिचा चेहरा हातात घेऊन तिचे डोळे पुसू लागला.
"मला माहितीय तुला तुझे घरचे कशे वागवताय ते कळतय मला तुला कस वाटतंय , तुझी आई जे बोलली ते नको होत बोलायला माझ्यावरून खूप सहन केळले तू मला आत्ता अस तुझ रूप नाय बघवत मी त्यांची माफी मागतो पाया पडतो जे म्हणतील ते करतो पण तुझ्याशी बोल अस म्हणतो" समीक्ष तिच्या समोर हातावरे करून तिला समजाऊ लागला
समीक्ष च्या हाताला झटका देत ती बोलू लागली "मला माझ्या आईचा आणि घरच्यांच काहीच वाटत नाहीये आणि तू कोणाचीच माफी नाय मागायची उलट त्यानीच तुला जशी वागणूक दिल्ली त्यावरून त्यानीच तुझी माफी मागायची माझ्यासाठी तू आपला स्वाभिमान नाय घालायचा तुझ्या स्वाभिमान म्हणजेच माझ्या स्वाभिमान आणि आपण काहीच चुकीच केलेल नाही त्यांना वाटत तो त्यांचा प्रश्न" तिच्या अश्रु ओघळणाऱ्या डोळ्यांतून आत्ता थोडा रंग दिसत होत्त.
"मग अस का करते रोज इथ येऊन बसतेस के झालंय ते तरी सांगणा" आपल सगळ प्रेम डोळ्यात एकवतून समीक्ष हटणच्या खून करून तिला विचारू लागला
"मला अस वाटत की आज पर्यन्त सगळे जन माझ्यासोबत आपुलकीने प्रेमाने वागत आलेत कारण मी मुकी आहे मम्मी पण माझ्यासोबत त्यामुळेच प्रेमाने वागता कारण मी मुकी आहे मला बोलत नाय येत म्हणून आणि दिदीचा नजरेत तर कायम सहणभूती दिसते मला याच पण काही नाही वाटत पण खूप दिवसांपासून माझ्या डोक्यात एक विचार घर करतोय म्हणजे मला आत्ता अस वाटते की तू सुद्धा मी मुकी आहे म्हणून प्रेम करतोस माझ्यावर" अश्रु अनावर होऊन मिनाक्षी परत रडू लागली
समीक्षच्या चेहऱ्यावर नकळत एक खोडकर हसू रुतल ते मिनाक्षी नजरेत आल आणि ते थांबनयास्तही तिने एक अल्लद आसा धक्का समीक्ष ल दिल तो त्या गतिज ऊर्जेने मागे सरकला परत मिनाक्षी ला जवळ घेऊन बोलू लागला
"खर सांगायच तर मी तुझ्या खोडकर पणाच्या जास्त प्रेमात आहे आत्ताच बुगह रडता रडता पण मारतेय मला, अरे येडा बाई मला तुझ्यावर सहानभूती म्हणून प्रेम नाहीये प्रेम आहे म्हणून सहानभूती आहे म्हणजे काळजी आहे. तुल लहान पन पपासून मोठ होताना बुगहितले मी तू जेव मला दिसायची तेव्हा मला काळात नवत मी प्रेमाने बुगहतोय तुझ्याकड मला जय वयात तुझ्यावर प्रेम झालंय ना त्यावयात ही पण काळात नाही की काय चूक यांनी काय बरोबर हीे कसस कळणार की सहानभूती असायला हवी मला ना खर तर तुझ्या सगळ्या बालछटांचा जास्त आनंद वाटतो माझ्या तोंडावर हसू आणणारे तुझे चाले तुझ्या निरागस पण आणि माझ्यात संवलेली तू मला तू हवीय तुझ कोणता एक गुण किंवा कोणता एक शरीराचा भाग नाही तुझ्या भोवती मला फिरायला आवडत तुला मधून मधून उगाचच त्रास द्यायला आवडत लहान मुलासारख तुझ्या पदराला धरून तुझ्या मागे हिंडाव वाटत तुला घास भरवावे लागत तुम्ही रूसल्यावर काहीही करून तो सोडवावा लागतो. तुझ्याशी मी माझ्या मनातली कोणतीही गोष्ट बोलू शकतो आणि काही कापवता नाही येत मला तुझ्यापासून सगळ काही करतं पहिले तुझ्याच विचार असतो तू म्हणजे माझ्या जगणयातला अविभाज्य घटक आहेस. तूझ्या बद्दल मला जे वाटत ते कोणविषयी कधीच वाटत नाही आता मी तुला शरीराच सांगतो मला फक्त तुझ्याकडेच समाधान भेटत आणि उत्तेजना पण तुझ्या कडूनच मिळते. तू तुझ्या सर्व गोष्टी झाकते सगळ काही माझ्यासाठी राखून ठेवते अनि माझ्यासाठी मला चांगल वाटव म्हणून वेगळ्या वेगळ्या गोष्टी करतेस कधी लाडात आली तर हमखास येऊन मिठी मारतेस माझ्या हातात हठ घेते काहीतरी खोद काढते कोणी नसेल तेव्हा माझ्याच ताटत जेवायला बसते ह्या सगळ्या गोष्टीं वरुण आपण एकमेकसाठी काय आहोत ही समजत" समजावतान हठवरे करून दामलेला समीक्ष थांबून एक मोकळा श्वास घेऊन परत बोलायला लागतो " कोण म्हणत तू बोलत नाही त्या भिरभिरत्या डोळ्यानि मला कायम सांगत असते ही कर ते नको करू कधी आस घरच्यांच्या किंवा पाहूनच्या गर्दीत तुला काय हाव किंवा मी काय कारव ही डोलयानीच तर सांगते मला चिडते, बाजवते, धमकी देते सगळ काही डोलयाणी सांगते खूप काही बोलते तुझ्या हातानी पण तुझ्या त्या छोट्या छोट्या गोष्टिनी आणि चाळयांनी पण कसकाय तू काही बोलत नाहीस. आणि मम्मी किंवा कोणी काय विचार करत ही आपण कस बदलणार पण मी तुझ्या प्रेम मानपसून करतो" मिनाक्षी च्या नजरेत प्रेमाचे अविभाज्य भाव आत्ता दीसात होतते ती समीक्ष कडे खूप मायेने बघत होतटि ही त्याच्या लक्षात आल साडी तुण दिसत असलेलयपोटावर अल्लड चिमटा घेऊन तो मिनाक्षी ल बोलला "भूक लागलिय खायला दे ग माय" चिंतयाने सवरलेली मिनाक्षी आत्ता हसू लागली होती आणि समीक्ष तिला हसताना पाहून परत एकदा तिच्या रूपाचा अथांग सागरात हरवाला होत्ता
- Get link
- X
- Other Apps